मरवा- इंदिरा संत

पुस्तकातली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे
पिसाहूनही सुकुमार काहीसे
देता देता त्यात थरारे..

मेजावरचे वजन जरासे
म्हणून दिला नाजूक शिंपला
देता देता उमते काही
मिना तयाचा त्यावर जडला

असेच काही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताहा मरवा
देता घेता त्यात मिसळला
गंध मनातिल त्याहून हिरवा

- इंदिरा संत

1 comment:

 
Designed by Lena