नुस्तीं नुस्तीं राहतात- आरती प्रभू

प्रत्येक झाडाचे
प्रत्येक पक्षी कसले तरी
कसले तरी गाणें गातो
प्रत्येक सूर
पानाइतकाच झाडांनाही
आपला आपला वाटतो

गाणें गातात
देणें देतात
झडून जातात
उडून जातात
झाडें नुस्तीं नुस्तीं उभी राहतात.

- आरती प्रभू

2 comments:

  1. `ये रे घना, ये रे घना..` ही कविता अपुरीच आहे का इथे? `टाकुनिया घरदार नाचणार नाचणार...` अशा ओळी आहेत ना पुढे?
    एरवी तुमचा हा ब्लॉग भारी. एकदम.
    sakul05@gmail.com

    ReplyDelete
  2. प्रिय अज्ञात,

    कविता पूर्ण लिहून अपडेट केली आहे. ध्यानात आणून दिल्याबद्दल आणि पुढील अनेक रसभंग टाळण्यात मदत केल्याबद्दल थॅंक्स!

    -श्रद्धा

    ReplyDelete

 
Designed by Lena