ती- इंदिरा संत

तो कधी येईल, कधी न येईल
कधी भेटेल, कधी न भेटेल
कधी लिहील, कधी न लिहील
कधी आठवण काढील, कधी न काढील
असा तो. एक अनिश्चिती..
बंदीस्त घडयाळातील लंबकासारखी. मृत्यूसारखी

त्या अनिश्चितीच्या ताणाच्या धाग्यांत
तिचे पाय गुंतणार, काचणार..
कोलमडणार..

पण तिने त्या रंगदार धाग्यांचा एक
पीळदार गोफ़ केला. आणि त्याच्या झुल्यावर
उभी राहून ती झोके घेऊ लागली..
या अस्मानापासून त्या अस्मानापर्यंत
अशी ती. एक मुक्ता.
वारयासारखी..जीवनासारखी.

- इंदिरा संत

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena