एक प्रश्न-सौमित्र

वर्षं जातात..
प्रेयसी जाते..
झोप जाते..
वय जातं..
अशा कित्येक गोष्टी
काहीही न सांगता
निघून जातात..
शेवटी..
काहीही गेल्यावर..
स्वत:चेच श्वास ऐकत पडून रहावं..
अशी रात्री-अपरात्रीच्या
हक्काची जागाही जाऊ लागते
तेव्हा..
आपण कुठे जायचं असतं?

-सौमित्र

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates