शब्द म्हणजे- शांता शेळके

शब्द म्हणजे असतात केवळ बेटें
पाण्याने वेढलेली, एकमेकांपासून तुटलेली
सांभाळीत उरावर निबिड अरण्यें, हिंस्त्र श्वापदें
दूरचे क्षितिज न्याहाळीत आपल्यांतच मिटलेली

शब्द म्हणजे केवळ तारा, निर्जीव वीजवाहिन्या
क्षणकाळ पेटणारया, एरव्ही विझलेल्या,
पेटतेपणाची अतुर प्रतीक्षा करीत
मनातल्या धुळीमध्ये घनघोर निजलेल्या

शब्दांनीच परस्परांना भिडू पाहतो आपण
लढू बघतो आपण.
शब्दांना शब्द भेटतीलच असं नाही
शब्दांनी शब्द पेटतीलच असं नाही

-शांता शेळके

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena