कोबाल्ट आणि अल्ट्रामरीन

पाण्याच्या पदराआड
विणणारा शांतजलद कोळी
आणि डोळ्यांमधली
वरुण वळणं:
गवतात थबथबून निवळणारा
जिवंतपणाचा
हिरवा संधिप्रकाश:
उत्तुंग मनोरे
निऑनच्या भाषेतले:
रात्रभोर नितळ डांबरी रस्ते
जिथं अक्षरांचा विस्तव विझतो
आणि प्रचंड पियानोचं अंतरंग
भरतीओहोटीच्या पटट्या दाबून
समुद्राचं अंतिम नोटेशन वाजतं
आपल्या आंथरुणापासून
थेट सगळ्या रिकाम्या रस्त्यांपर्यंत, गच्च्यांपर्यंत

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates