भ्रम -पद्मा लोकूर

एक भ्रम होता:
उतरता येते शब्दांच्या पायरयांवरुन
खोल खोल गाभारयात.

असाही एक भ्रम:
बुडता येते पापणीच्या केसावरुन
डोळ्याआडच्या गूढ बाहुलीत.

पहिला भ्रम घसरला
शब्दांच्या वापरलेल्या गुळगुळीत पायरीवर
दुसरा भ्रम ठिबकतो आहे मात्र-
पापण्यावरुन..तुझ्या गालांवर..ओठांवर..


-पद्मा लोकूर

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates