कविता-२ -इरावती कर्वे

लाडके, हे चार दिवस
आता तुझे माझे आहेत

पदराखालून तुला पाजीत होते
भोवताली किती माणसं होती
पण तूं आणि मी
एवढेच एकत्र होतो
अगदी तशीच आपण आज असू. यें.

भोवताली तिर्र्हाईत आहेत
पण त्यांची जाणीव नाही
त्यांची अडचण नाहीच

आज तू पांघरुण घेतले आहेस
झाकण लावून घट्ट बंद केले आहेस
दरवाजा लावून टाकला आहेस


-इरावती कर्वे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates