बोलणे. -पु.शि.रेगे

तू बोलत नाहीस
..
..
..
त्यातून मी एक अलाहिदा अर्थ काढला

त्याचीच ही गाणी झाली,
काही कहाण्या,
एक-दोन अनोळखी संवाद,
अर्धेमुर्धे दर्शन..

मग मला समजले
हेच तुझे बोलणे होते..
सहज मनमोकळे,
पहाटेच्या अरुवारीचे.


-पु.शि.रेगे

3 comments:

  1. रेगे काही मी वाचले नाहीयेत. आता 'अरुवार' म्हणजे काये?

    ReplyDelete
  2. हा हा.. मी आहे ना? मी सांगीन रेगे. (अर्थात मलाही कळले असतील तरच)
    निखिल, ’अरुवार’ हा शब्द एकदा-दोनदा डोळे मिटून म्हणून बघ नं. शब्दांचं टेक्स्चर कसं आहे, ते कसे साऊंड करतात हे कळलं तरी बहुतेक वेळा अर्थ समजायला मदत होते. कधीकधी जो शब्द कळला नाही त्याचा ’होमोपोनिक’ शब्द शोधावा, अर्थ आसपासचाच असतो. अरुवार चा होमोफोनिक कोणता- अलवार, हळूवार.
    पहाटे पहाटे प्रकाशाची प्रखरता कशी असते? अगदी प्रकाशाची tinge असते. पण त्यामुळे आपण प्रकाश नाही असं म्हणू शकत नाही. जे नाही असं वाटतं पण तिथे नक्की असतं, इतकं ते हळवं, किंचितसं असतं,( आणि ते किंचितसं असतं म्हणून त्याबद्दलचं आकर्ष्ण तेवढ्याच चढत्या भाजणीतलं) त्याला ’अरुवार’ म्हणतात. :)

    ReplyDelete
  3. वेल, त्याचा विचार केला होता. पण दोन-दोनदा 'र' वापरून देखील अर्थ मुलायम असणे जरा अवघड वाटले. हळुवार, अलवार, अलगद मध्ये कसे 'ल' 'ळ' आहेत, 'र' असेल तरी एकदाच आहे. या 'र' ची पुनरुक्ती उच्चारसाधर्म्यापेक्षा वरचढ वाटली आणि गडबडलो. शब्द उगीच जास्त 'खरखरीत', 'रखरखीत' वाटला...

    ReplyDelete

 
Designed by Lena