भिलोरी बोलीतील कविता-३ -बाहरु सोनावणे

"अतली वार रं!
कवयस्नी घंट्टी वाजी गईस्नं
बठ्ठं पोरं येई लागनसत शायमां
गुरुजी व्हाराला धाडनास मला
चाल जल्दी!"- किसू आंखना
तवय दिलप्या
"येवू रं, हागाला गयला तिमा
वाट लग्गी गई
जब्बर काम लिवां आयल्यात भो
मनी चड्डीमां
हागता-हागता बठ्ठ्या मारी टाकना
वसन लिखान पिखल र्हईत गयत अव
चड्डीबी बठ्ठी
किटा-
ईली
फ़ाटली
लिखा अन पिखलं
फ़ेकी देवाना इचार फ़िरी गयला पन
पव्वाला दुसरी चड्डी न्हा मिय न!"

"इतका उशीर रे!
केव्हाची घंटी वाजून गेलिये
सर्व पोरे केव्हाची आलीत शाळेत
गुरुजींनी बोलवायला पाठवलंय मला
लवकर चल!"-किसू म्हणाला.
तेव्हा दिलप्या-
"येतो रे! हगायला गेलो होतो म्हणून
उशीर झाला.
भयंकर उवा होत्या गड्या
माझ्या चड्डीत.
हगत हगत सर्व मारुन टाकल्या
तरी अंडी आणि बारीक पिल्लं राहूनच गेलीत आणि
चड्डीही सर्व
मळ-
लेली
फ़ाटकी.
अंडी आणि बारीक पिल्लं
फ़ेकून द्यायचा विचार मनात येऊन गेला होता , पं
घालायला दुसरी चड्डी नाही ना!"

-बाहरु सोनावणे

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena