कागदावर लिहावी- सदानंद रेगे

कागदावर लिहावी
दरवळणारी कविता.

कागद जाळून मग
करावी तिची रवेदार राख.

त्या राखेने घालावं
चराचराला गोपीचंदन स्नान.

सारया प्रश्नाचं अत्तर
अखेर एकत्रच असतं-

राखेच्या राखेच्या
आतातातात....


-सदानंद रेगे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates