पंख- मोहन मुळे

खुडून
ठेवलेले पंख
अजूनसुद्धा फ़डफ़डतात
पण-
त्या पक्ष्याचं
काय झालं असेल आता
ते सांगवत नाही
विचारलं तर
पंख स्तब्ध मौन पाळतात
कदचित-
शपथ आभाळाची,
पक्ष्यानेच त्यांना घातलेली
आठवून.


-मोहन मुळे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates