फ़किरी गाणे- विंदा करंदीकर

एक दिवस व्रजाला मिळतो,
एक दिवस पण मिळे फ़ुलांना;
एक दिवस शहाण्यांचा येतो,
एक दिवस पण असे खुळ्यांना.

एक दिवस विजयाचा असतो,
एक दिवस असतो शरणाचा;
एक दिवस जगण्याचा असतो,
एक दिवस असतो मरणाचा.

एक दिवस असतो याचा अन
एक दिवस असतो त्याचाही!
तुझीच असता रात्र, सखे, पण
या दिवसाची कुणास घाई.

-विंदा करंदीकर

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates