तसेच घुमते शुभ्र कबुतर- विंदा करंदीकर

मनात माझ्या उंच मनोरे;
उंच तयावर कबुतरखाना;
शुभ्र कबुतर घुअमतें तेथें
स्वपनांचा खाऊनिया दाणा.

शुभ्र कबुतर युगायुगांचे-
कधी जन्मले? आणि कशास्तव?
किती दिवस हे घुमावयाचें?
अर्थावांचुन व्यर्थ न का रव?

प्रश्न विचारी असे कुणी तरि;
कुणी देतसे अगम्य उत्तर!
गिरकी घेऊन अपणाभंवती
तसेच घुमते, शुभ्र कबुतर.

-विंदा करंदीकर

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates