ज्वाला आणि फ़ुले- बाबा आमटे

निर्मीतीचं एक नातं जमिनीशी आहे,
कारण
तीच आहे जन्मदात्री, सारया भविष्याची
मातीशी ईमान सांगणारे युवकांचे तांडे
प्रेरणांच्या तरफ़ांवर उद्याची क्षितीजं उजळीत
अन ओसपणाचे कोसच्या कोस तुडवीत
जेव्हा निघतील दाही दिशांनी
दरयाखोरयांमध्ये आपले नि:श्वास उतरवीत
तेव्हा ही धरित्री होईल
सुजलाम, सुफ़लाम, मंगलदायिनी.

-बाबा आमटे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates