दंतकथा- विंदा करंदीकर

असे म्हणतात की, अमेरिकेत एक एकाक्ष कुबेर आहे.
तो वर्षभर मोजीत असतो स्वत:च्या मोटारी
अणि स्वत:च्या अंगावरचे सोनेरी केस; पण त्यापैकी
जास्त कोण हे त्याला अजूनही कळलेले नाही.

असे म्हणतात की, फ़्रान्समध्ये एक दारुचा व्यापारी आहे.
त्याने एका वर्षात मिळवलेला नफ़ा मोजण्यासाठी
फ़्रेंच सरकारला सात वर्षे लागतात; त्याच्या एकटयाच्या
इन्कमटॅक्समधून फ़्रेंच लष्कर एका महायुद्धाचा खर्च भागवते.

असे म्हणतात की, आफ़्रिकेमध्ये कांगो नदीच्या प्रवाहाखाली
ब्रिटीशांनी बांधलेले एक मोठे भुयार आहे. त्यांत टाकलेल्या
प्रत्येक काळ्या कवटीचा एका वर्षाने एक मोठा दिस येतो;
पैलू पाडण्यासाठी हे सर्व हिरे अमेरिकेत पाठवले जातात.

असे म्हणतात की, रशियामध्ये एक मोठा तुरुंग आहे.
त्या तुरुंगाला गज नाहीत. "आमच्या तुरुंगाला गज बसवा,"
असा अर्ज तिथील बंदीवानांनी सरकारकडे केलेला आहे.

असें म्हणतात की, या सगळ्याच दात नसलेल्या दंतकथा आहेत.

-विंदा करंदीकर

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates