घेता- विदा करंदीकर

देणा-याने देत जावे;
घेणा-याने घेत जावे

हिरव्यापिवळ्या माळावरुन
हिरवीपिवळी शाल घ्यावी;
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेडयापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याशा भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी.

देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावे.

-विंदा करंदीकर

4 comments:

ujjwala annachhatre said...

देणार्याचे हात घ्यावे

Amit Rane said...

मला ही कविता आवडते. मला शेवटचा कडव्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. मला अर्थ सांगाल का शेवटचा कडव्याचे...

SHALINI GANESH said...

या कवितेचा अर्थ सांगा

SHALINI GANESH said...

या कवितेचा अर्थ सांगा

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates