ट्रुथब्रश- मनोहर ओक

माझ्याकडे एक ट्रुथब्रश आहे
तुम्हाला पाह्यजे?
एकतीस वर्षं माझ्याकडे एक झिंगुर होतं
फ़ार गडबड करायचं
मिशा धरुन टाकून दिलं
आता कसं शांSSत वाटतं

आपणहूनच
मी काही कर्जाऊ उंदीर आणलेवते
कधीमधी
तेवढंच जरा
दुकटं वाटायचं

माझा धंदा आहे
स्वत:ला फ़सवणं
तेवढीच जरा दिल्लगी
डोळ्याला डोळा

एकदा काय झालं
तो ट्रुथब्रश
मी सहज आरशावर घासला
तर आरसाच गेला.

-मनोहर ओक

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates