पानगळीनंतर- मनोहर ओक

पानगळीनंतर,
एका झाडाला डवरुन आले कावळे
हे पाहतच, लहान मुलांकरिताचाची (शाळेतील)
गो स्लो पाटी ताडकन
आपटली डोक्यावर
मागच्या मागे

तडक उठला
एक वेडा
त्याने सगळे ट्रॅफ़िक -सिग्न्ल्स
ऑफ़ करुन टाकले

सुटका झाल्यागत
सुस्कारा सोडून
सगळ्या बसेस, गाड्या, स्कूटर्स
हसत खेळत
एकमेकावर आदळू लागले.

-मनोहर ओक

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates