आरसे- मनोहर ओक

किरर्र्र आरश्यात पौर्णिमा संभवत नाही
टांगते आरसे मागील भिंत भेदत नाहीत
भेदून टाकतात समोरचा चेहरा
डोळे डोळ्यावर चालून येतात
माणूस स्वत:वरुन बेफ़ाट पिसाटासारखा धावत सुटतो

आरसे असतात तेच मुळी निनावी
लख्ख नागवे
नागव्याला निरी नसते
आरसे फ़ेडता येत नाहीत
आरसे आरश्यावर ठेवल्यावर
त्यांच्यातील घनघोर जबडा मिटून जातो.

आरशांवर दगड मारताच
रक्तबीज राक्षसासारखे
तुकडया तुकडयांमधून ते खदखदा हसतात
आरसे-उन्हं-ओल्या पाट्या

आरशांवर लिहीता येत नाही
आरसे हे एक प्रकारचे कोळसे
त्यांच्यातून सुर्योदय होत नाही.

-मनोहर ओक

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates