संरक्षित कुंपणाआड भक्तीच्या
देव
बसच्या रांगेत उभं राहून
आराधना करा
देव एक बॅंकेमधील ठेव
आहे?
निर्णयाचा दगड बांधून
बुडी घेणारे संत
काळाच्या प्रवाहात
प्रेतासारखे तटतटून
लेखक कसे सापासारखे
माणुसकीच्या शेपटीवर
पाय दिल्यावर दंश करणारे.
-मनोहर ओक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment