मला माहित्ये- मनोहर ओक

मला माहित्ये दुर्बीण लावून जाणारा एक आंधळा
मला माहित्ये साखरेची चिमूट तोंडात ठेवून आत्महत्या करणारा
मला माहित्ये आयुष्यभर फ़ूल न खुडणारा
मला माहित्ये कलेकलेने अस्वस्थ होणारा पूर्णचंद्रात ठार वेडा
मला माहित्ये पायाच्या अंगठाबोटात ब्लेड-धाक दाखवून महारोगी
                                                                        लुटणारा
मला माहित्ये वांद्रा हायवेवर रात्री दीड वाजता रॉकेलमध्ये
काळजी तळून बाजूच्याच दगडावर डोकं ठेवून झोपणारी
’हवा मां’ जख्खड म्हातारी
मला माहित्ये इरकली नेसून वेणी माळून पान खाऊन जाणारी कोडी बाई
हसतमुख
मला माहित्ये उगाचच्या उगाच काही गोष्टी
एरवेळी कब्जा घेणारया..

-मनोहर ओक

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates