हे एक झाड आहे- शांता शेळके

हे एक झाड आहे : याचे माझे नाते
वार्‍याची एकच झुळुक दोघांवरुन जाते

मला आवडतो याच्या फुलांचा वास
वासामधूने उमटणारे जाणीव‌ओले भास

पहिल्यानेच याची मोहरतांना फांदी
ठेवली होती बाळगाणी याच्या कटिखांदी

मातीचे झाड : झाडाची मी : माझी पुन्हा माती
याच्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती

ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल
रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल

कधीतरी एके दिवशी मीच झाड हो‌ईन
पानांमधून ओळखीचे जुने गाणे गा‌ईन

-शांता शेळके

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates