झाडावर त्याच्या फुले- नितीन तेंडुलकर

झाडावर त्याच्या फुले फुलतच नव्हती
तशी त्याने खूप मनधरणी
केली होती झाडाची
सदैव त्याचे तळहात बरबटलेले

अलीकडे दोनचार पक्षीही फिरकून गेले होते
ॠतूच्या शेवटाला
ॠतूचे बदलणे म्हणजे झाडातील पानांवर
लिहीलेले रेषांचे नशीबच...

शेवटी बरबटलेल्या हातांनी
ना‌इलाजानेच तो स्वत:कडे वळला
आत्मसुखासाठी
आणि त्याने स्वत:चीच मशागत सुरु केली

तेव्हा
सारे झाडाचेच गुणधर्म त्याच्यात रुजलेले
त्याने पाहिले
...आणि मग तो सुखी झाला

-नितीन तेंडूलकर

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates