तिथून पुढे- सलील वाघ

कधी आठवणीनी
पोनीटेल हेलकावत
जाणारी तू
डोळ्यासमोर आली की
एका झटक्यात शॉक सारखं
सगळं
डोळ्यापुढे तरळतं
कालपरवासारखं

कॉलेज
क्लास
परीक्षा
रिझल्ट
आयुष्य
मी
वाचन
चर्चा
वाद
पुस्तकं रॉय
आणि तत्वज्ञान

आणि ह्या सगळ्यांमधे
डेन्सर मिडियमकडून
जशा वेव्हज रिफ्लेक्ट होतात
तशा कविता
सगळंच

मुठभर हे श्वास
अजून रोखून ठेवलेत
तू आलीस की
मिळेल तो बिंदु पकडुन
पुन्हा जगायला श्रीकारापासून.

-सलील वाघ

2 comments:

  1. आहे नं? :) हं!
    सलील वाघच्या कवितांचं पुस्तक मी पाथफ़ाईंडरला पाहिलेलं शेवटचं. नंतर कुठे दिसलं नाही मला.

    ReplyDelete

 
Designed by Lena