एक पुरुष हवा आहे- अनुराधा पोतदार

एक पुरुष हवा आहे.
या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे.
बटनं सापडत नाहीत म्हणून आरडा‌ओरडा करत घर डोक्यावर घेणारा,
आमटीला फोडणी खमंग पडली म्हणून हुशारुन जाणारा,
केसातून बोटे फिरली की बाळ हो‌ऊन कुशीत घुसणारा,
दमदार पावलांनी तिन्हीसांजेचा केविलवाणा अंधार उधळून टाकणारा
पुरुष हवा आहे
या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे.

नाही..
हे मी म्हणत नाहीये,
या भिंतीच म्हणून राहिल्यात केव्हापासून

-अनुराधा पोतदार

4 comments:

  1. vachali hoti ekada.. nond hi keleli aahe.. parat ekda aaj tuzhya post chya nimittane vachayala milali dhanyawaad Shraddhaa

    ReplyDelete
  2. हम्म..माझ्याशिवायही ही कविता वाचलेलं कोणीतरी आहे हे पाहूनच मस्त वाटलं. माणसं वाटतात तेव्हढी दूर-दूर नसतात ही जाणीव खरया अर्थाने पुस्तकं, कविता यांच्यामधून अशी होते, नाही का?
    मी सत्यकथेत वाचलेली ही. तू कुठे वाचलेलीस?

    ReplyDelete
  3. पुरूषपण काय असते ते एखादी स्त्रीच सांगू शकेल ...
    पण त्यात भेसळ असेल ती स्त्रीत्वाची ... तिच्या दृष्टीकोनाची .... आणि दृश्‍ीटिकोन बनलेला असेल ..
    कित्येक शतकांनी बिघडलेल्या संस्कृतीपासून ...

    ReplyDelete
  4. आणि वाईस अ व्हर्सा सुद्धा तेव्हढंच खरंय. पण आता इथे कवितेचा तो मुद्दा नाही. :)
    पण तुझ्या बोलण्यात पॉईंट आहे आणि तू वर म्हटलं आहेस ते तसं असतंच.

    ReplyDelete

 
Designed by Lena