तीन-सलील वाघ

ह्या दिवसात
कोणत्या ना कोणत्या बहाण्यानी
तू येतेस
हे मला आता नक्की माहित झालंय
कारण
प्रकाशाचा स्त्रोत
जमिनीशी
जवळजवळ एकशे ऐंशी अंशाचा कोन करतो
त्यावेळी
मऊस्मूथ मातीवर
क्षुल्लक छोट्या खडयांच्याही
सावल्या पडतात
ह्या दिवसात
तू नेमकी येतेस
हे मी अगदी ओळखलंय
कारन नवा अस्पष्ट मोहोर
थोडा थोडा कुठे ठळक तरतरीत होत असतो
आणि निसटून पडणारी पानं परस्पर
वारयानी कुठल्याकुठे दूर जातात
झाडे रस्ते ठिकाणं
यांच्या अंगाला
एक खूप मस्त वास येतो

-सलील वाघ

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates