तारांचे षष्टक- लॉर्का

Las Seis Cuerdas 


La guitarra
hace llorar a los sueños.
El sollozo de las almas
perdidas
se escapa por su boca
redonda.
Y como la tarántula,
teje una gran estrella
para cazar suspiros,
que flotan en su negro
aljibe de madera 


-Federico Garcia Lorca

तारांचे षष्टक

गिटार 
स्वप्नांत वाजते
मुसमुसल्यासारखे
तेव्हा वाटतं, 
ही सर्वस्व हरवलेल्या माणसांच्या ओठांतून 
निसटलेल्या हुंदक्यांची
आवर्तने आहेत
आणि, 
एक प्रचंड मोठा कोळी
एक भव्य जाळे विणतो आहे
त्या काळ्यासार लाकूडबंद 
पोकळीतून येणा-या 
सुस्का-यांना पकडण्यासाठी..


-फ़ेडरिको गार्सिया लॉर्का.

4 comments:

Meghana Bhuskute said...

इंदिराबाईंची एक कविता शोधत शोधत इथे आले. मग कवी बघून सुखावले. लॉर्का बघून तर... एकदम दोन अ‍ॅण्टेना उगवल्या डोक्यावर. मग कवितेच्या खर्‍याखुर्‍या हस्तांतरणाची व्याख्या पाहून, हा ब्लॉग कुणाचाय ब्वॉ, असं बघत खाली आले, तर तू!
हाय का!

Shraddha Bhowad said...

ए छान कमेंट लिहीणारया बये,
खाली बघत आलीस तर मी पाहून "च्यायला, आणखी कोण असणार?" असा विचार नाही का आला? अतरंग लोग बहुत कम रह गये, एक तुम और हम(बेशक) रह गये नुसार?
लॉर्का, बोर्जेस सगळे अनुवादित होऊन पडलेत. घालते सवडीने. तू अनुराधा पाटिलांचं काही वाचलं आहेस का? नसशील तर एकदा डोळ्याखालून घाल.

विक्रम said...

लोर्काच्या कविता आधी कधी वाचनात आल्या नव्हत्या. धन्यवाद

Shraddha Bhowad said...

विक्रम,
लईच एनीटाईम वगैरे.
अजून टाकणारेय-जस्ट बेयर विथ मी!

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates