अनुच्चारीत- शांता शेळके

किती जिवलग असते
एखाद्या सुंदर अनुच्चारीत गोष्टीचे
आपल्यासोबत दूरवर येणे!
किती अवघड असते!

उच्चारणाहूनही लोभस
असतात कधी कधी उच्चारवाचे आभास

जिवापासचा भुलवा घमघमत उठवायचा
अन पुन्हा तो कल्लोळ जिवापाशीच रोखायचा
हळूहळू नादच जडतो या प्राणांतिक आनंदाचा

ओठ हलवायचा, थांबवायचा
शब्द मनवायचा, मिरवायचा

उन्हात धरलेल्या बोटामधून झिरपावा लाल उजेड,
तसा त्या अस्तित्वाचा लोभ पसरत राहतो.
अन कोरांटीच्या तळामधला चुपावासा मध,
तसा जगण्याच्या मुळाशी
थेंब थेंब गोडवा साठत जातो.

-शांता शेळके

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates