लक्ष्मणरेषा- पद्मा गोळे

सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने
तिने ती ओलांडली आणि झालें रामायण
आमच्यापुढे दाही दिशा लक्ष्मणरेषा:
ओलांडाव्याच लागतात,
रावणांना सामोरे जावेच लागते!
एवढेंच कमी असते;
कुशींत घेत नाही भुई दुभंगून!

-पद्मा गोळे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates