हस्तांदोलन- पद्मा गोळे

नियतीने करायला लावलें तें मीं निमूट केले
नियतीने करू नको म्हटलें तेही धृष्टपणें केले:
नियतीच्या डाव्या पायाची ठोकर खात
मी उजव्या पायाने तिला ठोकरून दिले.

आता आमोरासमोर उभ्या आहोंत दोघी
आधी कुणाचा हात येतो पुढे
हस्तांदोलनासाठी तें अजमावीत!

-पद्मा गोळे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates