अब्द अब्द- बा. सी. मर्ढेकर

किती पायी लागू तुझ्या
किती आठवूं गा तूंते;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनी येते.

काय गा म्यां पामराने
खरडावी बाराखडी;
आणि बोलावी उत्तरें
टिनपाट वा चोमडी.

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला!

- बा. सी. मर्ढेकर

1 comment:

  1. सुंदर कविता , धन्यवाद. देवाला उद्देशून लिहिली असेल का ??

    ReplyDelete

 
Designed by Lena