मध्यान्ह बावरे पक्षी- ग्रेस

मध्यान्ह बावरे पक्षी
जे उधळुनी गेले अंबर
ते पक्षीच आता म्हणती
हे पंखहि माझे नश्वर ...

पारांची गावे तेव्हा
संध्येवर धूप उजळती
प्रत्येक घरातुन एक हलते
मिणमिणती एकट पणती ...

गा‌ईंची गोरज धूळ
करुणाघन त्यांचे डोळे
बांधावर हंबर देती
वासरे मुकी वेल्हाळे ..

डोळ्यातिल स्वप्नतळांना
संध्येचा घुंगुरवाळा
क्षितिजावर तरिही झुलती
बगळ्यांच्या मोहनमाळा ...

- ग्रेस

1 comment:

  1. Copy paste disable केलंत ते उत्तम झालं.

    ReplyDelete

 
Designed by Lena