स्पर्श- विलास सारंग


रोममधल्या सेंट पीटरच्या पुतळ्याचा
डावा पाय
झडलेला- महारोग झाल्यासारखा
हजारो भाविकांनी स्पर्शून.

शिकागोच्या ’आर्ट इन्स्टिट्यूट’मध्ला
हुआन मीरोचा ’सूर्यपक्षी’--
हिरवट तांब्याचा,
एका गोलसर पंखाचं टोक
झालेलं चकचकीत तांबूस,
हजारो प्रेक्षकांनी स्पर्शून.

-विलास सारंग

--

होआन मिरो या चित्रकार, शिल्पकार आणि आणखीनही बरेच काही असलेल्या प्रतिभावान स्पॅनिश कलाकाराने १९६६मध्ये ब्रॉन्झमध्ये घडवलेले ’पाहारो सोलार’अर्थात ’सोलर बर्ड’ अर्थात ’सूर्यपक्षी’ हे शिल्प वाचकांच्या संदर्भाकरिता: (छायाचित्र सौजन्य: www.yelp.com, Photos of San Diego Museum of Art - San Diego, CA) मोठ्या आकारातले छायाचित्र पाहण्याकरता त्यावर क्लिक करा.आणि  सारंग म्हणतायेत तो सेंट पीटरचा, ज्याच्या पायाचं चुंबन घेतल्याने तुम्हाला मेल्यानंतर स्वर्गप्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे तो, आर्नोल्फो दि काम्बियोने ब्रॉन्झमध्ये घडवलेला पुतळाआणि त्याचा पाय:(छायाचित्र सौजन्य: https://twoyeartrip.com)
पुतळा हाच असेल तर, सारंग म्हणतायेत तो भाविकांची चुंबनं रिसीव करुन जवळपास वितळत आलेला पाय हा उजवा पाय आहे, सारंग डावा पाय का म्हणतायेत, ते न कळे.

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates