शहर- दया पवार


खोदकाम करताना विसाव्या शतकातले शहर सापडले
कागदासारखे कुणी आपल्या अजस्र मुठीत चुरगाळले.
भेलकांडलेली यंत्रचाके, थोटकासारखी गिरणीची धुराडी
यंत्रयुगाची येवढीच चाहूल, बाकी स्थिती मोहेंजोदारोतली

हातभर कुठेही खोदा, दगड गोटे मूर्ती शेंदरांनी माखलेल्या
काही तोंडाला सोंड फुटलेल्या, काही शेपूट अधांतरी तुटलेल्या
बरे झाले, या वर्षी म्युझियमचे दालन खूप छान सजले
भुसा भरून धर्म नावाचे सोंग पुढच्या पिढ्यांना दाखवावे.

अरे ही पाटी कसली ’पाणपोई सर्व जातिधर्मांना खुली’
म्हणजे माणसामाणसांत का होत्या उच्चनीच उतरंडी!
छान केले, असले शहर मातीत गाडण्याच्या लायकीचे
कसले ते यंत्रयुग, विसाव्या शतकात दर्शन अश्मयुगाचे!

-दया पवार

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates