सत्तावन्न -सलील वाघ


झंकारांचा शिडकावा
तुझ्या वास्तूवर
थडकून तशाच
परतल्या हाका
हात देऊन
किनारयावर घेतली
नि:शब्द हवा जंगलातली
स्तब्ध
रंगबेरंगी उजळत्या शहरात
पाठीवर हॅवरसॅक
त्यात सगळं आलं
शहरातले दिवे
माघारी
कित्येक रात्री रडले

-सलील वाघ

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates