पंच्याऐंशी. -सलील वाघ


तू अनंत रुपांत
येतेस कॉलेजातून
लायब्ररीतून ब्रिटीशकालीन लॅबमधून
कलरटीव्हीतून
आपली माती
आपली मानसं
मी स्वप्नं
मागितल्यावर तू
हळूच
का लाजतेस
माझे हात भाजले
माझी सायकल
पंक्चर झाली तर
तुला वाईट का वाटते
मी तुझे गाणे गातो
पिवळी तांबडी
फ़ुलं डोलतात

माझ्या दु:खांनी तू कष्टी
माझा तसा हेतू नव्हता

-सलील वाघ

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena