नाव -सलील वाघ


तुझ्या आयुष्यात मी
माझं मन मिसळलं

तुझ्या प्रगतीत मी वर्कींग कॅपिटल

तुझ्या कथा कविता कादंब-या झाल्या
तुझ्यावर मी माझ्या आयुष्याचा सिनेमा काढला

खूप कधीतरी आपण लॉंगड्राईव्हला निघू

चार पैशे आहेत
पुरेत-पेट्रोल टाकू

काचा वर करु
एकही जोक करणार नाही

एकदम सिर्येस
जणू काही शहाणा

-सलील वाघ

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates