अजुनी ना जखम बुजे- विंदा करंदीकर

भावातुर नजर तुझी,
भावोत्कट शब्द तुझे,
आठवती अजुनि मला;
अजुनी ना जखम बुजे.

अजुनी या विजनांतहि
प्रीतीचे स्तूप खडे;
...कललेले उंच माड
तुटलेले उंच कडे;

संथ निळा खोल डोह;
पंथ तृणांतिल हिरवा;
निजलेल्या पाण्य़ावर
बगळ्यांचा शुभ्र थवा;

नील नभा लुचणारीं
नील नील गिरीशिखरें;
रात्रीच्या खडकांतिल
सनईचे गार झरे...

अजुनी या विजनांतहि
प्रीतीचे स्तूप खडे,
त्याज वळुन जातांना
नावडतें तेच घडे!

-विंदा करंदीकर

2 comments:

MuktaSunit said...

मी कृतज्ञ आहे.

ujjwala annachhatre said...

त्या जवळुन जाताना

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates