देणा-याने देत जावे;
घेणा-याने घेत जावे
हिरव्यापिवळ्या माळावरुन
हिरवीपिवळी शाल घ्यावी;
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.
वेडयापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याशा भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी.
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावे.
-विंदा करंदीकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
देणार्याचे हात घ्यावे
ReplyDeleteमला ही कविता आवडते. मला शेवटचा कडव्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. मला अर्थ सांगाल का शेवटचा कडव्याचे...
ReplyDeleteशेवटच्या कडव्याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा दुसऱ्याकडून काही घेत असतो तेव्हा आपण त्या देणाऱ्यांची प्रवृत्ती घ्यावी म्हणजे आपण पण सर्वांना काहीतरी दिले पाहिजे
Deleteया कवितेचा अर्थ सांगा
ReplyDeleteया कवितेचा अर्थ सांगा
ReplyDeleteमलाही फ़ार महित नाहीं ! पण अर्थ (१) ज्याने आयुष्य भर दिले त्याच्या म्हातारपणी हाताना आधार द्यावा (२) देनार्याचे हात घ्यावे म्हंजे आपण ही देत जान्याचा प्रयत्न करावा आणी (३) आजच्या युगातिल “ गब्बर : ठाकुर हे हाथ मुझे दे दे “
ReplyDeletedenaryache hat mhanje daan karnyachi vrutyi
ReplyDeleteकवितेचे आशय सागां
ReplyDeleteMy favourite poem in 10th
ReplyDelete